आदर्श प्रशाला, नागज.
सांगली जिल्हयातील दुष्काळी कवठे महांकाल तालुक्यातील नागज गावातील आदर्श प्रशाला, नागज. ही एक माध्यमिक शाळा आहे. या शाळेमध्ये आय.बी.टी विषय सुरु आहे. उपक्रम /कार्यशाळा :- Learning Science Through Innovation at IISER,Pune
विज्ञान आश्रम व आयसर यांच्या तर्फे दि.०४-०७ -२०१६ ते ०८ -०७-२०१६ या पाच दिवसांच्या कार्यशाळेसाठी आम्ही पुण्यामध्ये आलो.येथे आम्ही विज्ञान विषयी प्रकल्प तयार करणार आहोत.ज्यामध्ये आय.बी. टी विषयाचा वापर करून प्रकल्प तयार करणार आहोत.जो समाज उपयोगी असेल व तसाच विज्ञान प्रदर्शनात दाखवता येईल.
प्रकल्प निवड :-
या कार्यशाळेच्या दुसर्या दिवशी आम्ही शेती, ऊर्जा आणि पर्यावरण या विषयातील आमच्या गावात असणार्या समस्या आणि त्यावरील उपायावर कल्पना विस्फोट या उपक्रमामध्ये आम्ही अभ्यास केला आणि त्यानुसार खाली दिलेला उपक्रम करावयाचे ठरविले आहे .
प्रकल्पाचे नाव:
आदर्श प्रशाला ,नागज शाळेभोवती , वर्ग खोलीतील व सभोवतालच्या परिसरातील कागद ,प्लास्टिक यांचे निर्मूलन करणे.
उद्देश :-
१)शाळेतील मुले-मुली वहीचे कागद ,खाऊचे प्लास्टिकचे कागद ,रिकामे पेन्स व बाटल्या शाळेच्या परिसरात टाकतात. आणि यामुळे कचरा निर्माण होतो.
2)निर्माण होणारा कचरा ही एक शाळेची समस्या आहे .
नियोजन :
१)वर्गखोलीतील बाहेरील कागदी कागद ,खाऊचे प्लास्टिक कागद ,रिकामे पेन्स व बाटल्या हे वेगवेगळ्या ठिकाणी गोळा करणे.
२)कागदी कागद ,चुरगाळलेले कागद आहे असे करून त्याचे गट्ठे तयार करणे.
३) कागदाचे गठ्ठे प्रत्येक दिवसाची नोंद करून ठेवणार.
४)शाळेत व वर्गखोलीत निर्माण होणारा सुका कचरा हे एका ठिकाणी गोळा करून त्याचे वजन करू व त्या प्रत्येक दिवसाची नोंद ठेऊ .
१) हा विज्ञान प्रकल्प होण्यासाठी उद्देश निट तपासा. तुम्हाला परिसर सुंदर हवा असेल तर तो कला विषयाचा प्रकल्प होईल.
ReplyDelete२) तुम्ही कुठला विज्ञानाचा प्रश्न सोडवणार आहात ?
३) डासां चे निर्मुलन हा तुम्हाला चांगला प्रकल्प होईल. त्याचा एक भाग म्हणून तुम्ही कचरा व्यवस्थापन करा.
४) डास कमी होण्यासाठी शोषखड्डे ,मच्छर अगरबत्ती ,मच्छर क्रीम , गुड नाईट द्रव्य , इ. च्या परीणामकारकातेचा अभ्यास असा प्रकल्प घ्या.
५) खालील व्हिडीओ तील मच्छर पळवण्याचे यंत्रबघा.
https://www.youtube.com/watch?v=pNjyLRQutXs
https://www.youtube.com/watch?v=qn1Uu00Ax5g
६) You may have to identify 10 ugly places in your neighbourhood. Geotag them.
Try to work on atleast one of the place as a Shramdaan.
http://www.theuglyindian.com/footpath.html
http://www.theuglyindian.com/paan.html
http://www.theuglyindian.com/dumps.html
http://www.theuglyindian.com/public.html
Mosquito free village :
ReplyDeletehttps://www.youtube.com/watch?v=S1AoH5jBpyc
Tembhurni
ReplyDeletehttps://www.youtube.com/watch?v=bixmLpe9rFE